पालिकेच्या टीबी रुग्णालयात ५ वर्षांत ३५ कर्मचारयांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 September 2014

पालिकेच्या टीबी रुग्णालयात ५ वर्षांत ३५ कर्मचारयांचा मृत्यू

मुंबई - मुंबई महानगर पालिकेच्या शिवडी येथील टीबी रुग्णालयामध्ये मागील पाच वर्षांत ३५ कर्मचाऱ्यांचा (टीबी) क्षयामुळे मृत्यू झाला. सन २०१४ या वर्षातच ३७ कर्मचाऱ्यांना टीबीचा आजार झाला असल्याचे कळते. या ३७ कर्मचाऱ्यांमध्ये २७ चतुर्थ श्रेणी कर्मचारी, ८ परिचारिका, एक डॉक्‍टर आणि एका लिपिकाचा समावेश आहे. जानेवारी २०१४ पासून चार कर्मचाऱ्यांचा टीबीने मृत्यू झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 


पालिकेच्या शिवडी येथील टीबी हॉस्पिटल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट आहे. जंतुसंसर्गामुळे कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले असल्याकडे संघटना वारंवार लक्ष वेधत आहेत. परंतु कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि आंदोलनांची दखल न घेणाऱ्या प्रशासनावर आता कर्मचाऱ्यांच्या मृत्यूचाही परिणाम होत नाही, अशी भावना व्यक्त केली जाते. या वर्षात आतापर्यंत क्षय रुग्णालयातील चार कर्मचाऱ्यांचे मृत्यू झाले आहेत. रुग्णालयातील क्ष-किरण तंत्रज्ञ रमेश जाधव (वय 50) यांचा क्षयामुळे नुकताच मृत्यू झाला. जाधव यांना वर्षभरापूर्वी क्षयाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्याने त्यांना क्षय रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. जाधव यांचा मंगळवारी (ता. 16) त्यांचा मृत्यू झाला. टीबी रुग्णालयातील कर्मचारी मृत्यूमुखी पडत असताना पालिका प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. 

Post Bottom Ad