प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या ३८ रेल्वे स्थानकांवर ८३ एटीएम (ऑटोमॅटिक टेलर मशीन) लावण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे प्रवाशांचा फायदा तर होणारच आहे शिवाय मध्य रेल्वेला ४४ कोटी ७७ लाख ८ हजार ७६१ रुपये एवढे आर्थिक उत्पन्नही मिळणार आहे; परंतु ही एटीएम अजून लागलेली दिसत नाहीत. त्यामुळे ही फक्त योजना आहे की, प्रत्यक्ष अमलात आणली जाणार याची वाट प्रवासी पाहत आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने आपल्या ३८ रेल्वे स्थानकांवर विविध बँकांची एटीएम लावण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये अँक्सिस, यश, कोटक महिंद्रा, बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. या योजनेनुसार कल्याण स्थानकात पूर्वेला ४ तर पश्चिमेला २, डोंबिवली स्थानकात ३, कोपर स्थानकात ४, कुर्ला स्थानकात १, मानखुर्द स्थानकात ४, भायखळा स्थानकात ५, दादर स्थानकात २, गोवंडी स्थानकात ३, कळवा स्थानकात २, किंग सर्कल स्थानकात १, घाटकोपर स्थानकात १, भांडुप स्थानकात २, बदलापूर स्थानकात २, आंबिवली, आटगाव आणि आसनगाव स्थानकात प्रत्येकी १, भिवंडी स्थानकात १, सीएसटी स्थानकात ३, कर्जत-कसारा स्थानकात प्रत्येकी १, खडवली स्थानकात आणि खर्डी स्थानकात प्रत्येकी १, मस्जिद बंदर स्थानकात १, माथेरान स्थानकात १, मुंब्रा स्थानकात ४, नाहूर स्थानकात २, नेरळ स्थानकात १, पनवेल स्थानकात २, परेल स्थानकात २, ठाकुर्ली स्थानकात २, ठाणे स्थानक ात ३, टिळकनगर स्थानकात ३, टिटवाला स्थानकात २, उल्हासनगर स्थानकात ३, वासिंद स्थानकात १, तर विक्रोळी आणि विद्याविहार स्थानकात प्रत्येकी ४ एटीएम मशिन्स लावण्यात येणार होत्या. त्यापैकी ७ रेल्वे स्थानकांत एटीएम लावण्यास सुरुवात करण्यात आली होती. परंतु अद्याप क ोणत्याही रेल्वे स्थानकांवर एटीएम लागलेले दिसत नाही आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.