मुंबई /प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीचे नेत्ते गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राचे नेते होते. त्यांचा घातपात झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्वात जास्त फायदा नितीन गडकरी यांना होणार असल्याने गडकरी यांची या प्रकरणी नार्को टेस्ट करावी अशी मागणी देश बचाव पार्टीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे.
मानवी हक्क आयोग, पोलिस आयुक्त, प्रधानमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री यांना पाटील यांनी एक निवेदन दिले आहे. या निवेदनात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची पहिली बातमी नितीन गडकरी यांनी प्रसार माध्यमांना दिली. गडकरी यांना मुंडे यांच्या अंत्यविधीच्या वेळी लोकांच्या रोषाला सामोरे जावेले लागले होते. गडकरी यांनी आधी पंकजा मुंडे - पालवे यांना पाठींबा दिला नंतर मात्र देवेंद्र फडणवीस यांचा उदो उदो केला. यामुळे गडकरी यांना पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रे दरम्यान दूर ठेवण्यात आले. यामुळे गडकरी यांच्याविरोधात संशय निर्माण होत असल्याने गडकरी यांची नार्को टेस्ट करावी अशी मागणी पाटील यांनी केली आहे. आपल्या या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.