पोटनिवडणूक : उत्तर प्रदेशात सपा तर राजस्थानात काँग्रेसची भाजपला धोबीपछाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 September 2014

पोटनिवडणूक : उत्तर प्रदेशात सपा तर राजस्थानात काँग्रेसची भाजपला धोबीपछाड


पोटनिवडणूक : उत्तर प्रदेशात सपा तर राजस्थानात काँग्रेसची भाजपला धोबीपछाड

नवी दिल्ली : नऊ राज्यांमधील 33 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्याचे चित्र आहे. उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी तर राजस्थानात काँग्रेसने भाजपला चारी मुंड्या चित करण्यात ब-याच अंशी यश मिळवले आहे. तसेच नरेंद्र मोदींच्या गुजरातमध्येही काँग्रेसने भाजपचे वर्चस्व यावेळी तरी मोडीत काढले आहे. त्यामुळे ही पोट निवडणूक मोदींसाठी धडा असल्याचे म्हटले जात आहे. 
 
दरम्यान लोकसभेच्या तीन जागांसाठी झालेल्या निवडणुकीत जैसे थे परिस्थितीचे चित्र आहे. उत्तर प्रदेशातील जागा सपा, गुजरातमधील जागा भाजप तर सीमांध्रातील जागा टिआरएसच्या ताब्यात गेली आहे.
 
उत्तरप्रदेशातील निकालांचा विचार करता येथील अकरा जागांपैकी 8 समाजवादी पक्षाने जिंकल्या आहेत, तर उर्वरीत 3 जागा भाजपने राखल्या आहेत. विशेष म्हणजे समाजवादी पक्षाने मिळवलेल्या आठपैकी सात जागांवर आधी भाजपचा ताबा होता. त्या खेचून आणण्यात सपाला यश आले आहे.
दरम्यान, इतर राज्यांत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भाजपने ममता बॅनर्जींच्या पश्चिम बंगालमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. याठिकाणी भाजपला एका जागेवर विजय मिळवला.
 
लोकसभेत सर्वाधिक यश मिळवून देणा-या उत्तर प्रदेशातील पोट निवडणुकीचा जबाबदारी भाजपचे खासदार आदित्यनाथ यांच्यावर होती. पण त्यांनी उचललेल्या लव्ह जिहादच्या मुद्याला जनेतेने नाकारले असल्याचे या निवडणुकीत दिसून आले आहे. मात्र तरीही योगी आदित्यनाथ यांनी या पराभवानंतर अत्यंत बचावात्मक प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुकीत मी ज्या ज्या ठिकाणी प्रचारासाठी गेलो, त्याठिकाणी पक्षाचा विजय झाला असे सांगत त्यांनी प्रश्नापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. तसेच तिकिट वाटप कसे झाले यावर विश्लेषण होणे गरजेचे असल्याचेही आदित्यनाथ म्हणाले.

Post Bottom Ad