मुंबई : खासदार डॉ. किरीट सोमैया यांनी आज (दि. ३ सप्टेंबर) महाराष्ट्राचे नवनिर्वाचित राज्यपाल पी. विद्यासागर यांची भेट घेतली. आदर्श घोटाळ्याच्या चौकशीसाठी जे. ए. पाटीलकमिशनची स्थापना करण्यात आली होती. या कमिशनने आपला अहवाल राज्य सरकारला सादर केला असून राज्य सरकारने तो स्वीकरलाही आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी राज्य सरकार का करत नाही? याबाबतची विचारणा सोमैया यांनी निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली.
या अहवालामधील परिच्छेद ७९ मध्ये दोषींवर ताशेरे ओढले आहेत. तसेच एकूण १३दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असूनही या आदेशावर काहीच कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न निवेदनाद्वारे विचारण्यात आला. यामध्ये माजी मुंख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही नाव आहे. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर कारवाईकरण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.