मुंबई - महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबरला रेल्वे परिसर स्वच्छता अभियान मुंबईत राबविण्यात येणार आहे. नागरिकांचे प्रबोधन करण्यासाठी विशेष लघुपट तयार करण्यात आला आहे. या दिवशी रेल्वेस्थानकांवर 126 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. सीएसटी, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, घाटकोपर, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पनवेल, इगतपुरी आणि लोणावळा या अकरा प्रमुख स्थानकांवर या मोहिमेवर लक्ष ठेवण्यासाठी दोन पाळ्यांमध्ये 22 वरिष्ठ अधिकारी तैनात असतील. मुंबई विभागातील 69 इतर रेल्वेस्थानकांवर 126 अधिकारी नेमले आहेत. स्थानक परिसरात घाण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश तिकीट तपासणीसांना दिले आहेत. रेल्वे वसाहतींमध्ये सहा पर्सनल ऑफिसर, इंजिनिअरिंगचे सहा अधिकारी व सहा आरोग्य अधिकाऱ्यांवर स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे.
Post Top Ad
25 September 2014
Home
Unlabelled
मुंबईत रेल्वेचे स्वच्छता अभियान
मुंबईत रेल्वेचे स्वच्छता अभियान
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.