रेल्वेचा राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र पाटील यांना जाहीर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2014

रेल्वेचा राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र पाटील यांना जाहीर

मुंबई - मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना 59 रेल्वेचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. मध्य रेल्वेच्या वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापकपदी असताना केलेल्या भरीव कामाबद्दल ऑक्‍टोबरमध्ये रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेच्या उत्पन्नात 9 टक्के वाढ करण्यात त्यांना यश आले आहे. यंदा 3 हजार 459 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, गेल्या वर्षी ते 3 हजार 177 कोटी होते. व्यावसायिक प्रसिद्धीतून मध्य रेल्वेला 33 कोटी 12 लाखांचे उत्पन्न मिळाले. गेल्या वर्षीच्या उत्पन्नाच्या तुलनेत ही वाढ 78.42 टक्‍क्‍यांनी अधिक आहे. 

पाटील यांच्या कार्यकाळात 194 जनसाधारण तिकीट बुकिंग सेवक नियुक्त करण्यात आले. या सेवेचा लाभ 2 लाख 14 हजार प्रवाशांना झाला. ही संख्या उपनगरी रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येच्या 12.21 टक्के आहे. एटीव्हीएमची योग्य प्रसिद्धी केल्यामुळे दररोज 3 लाख 2 हजार प्रवासी या सेवेचा लाभ घेत आहेत. यामुळे तिकीट खिडक्‍यांवरील 28 टक्के भार कमी झाला आहे. 

फुकट्या प्रवाशांवरील कारवाई व तिकीट काढण्याविषयी केलेल्या प्रचारामुळे उपनगरी प्रवाशांच्या दररोजच्या संख्येत सरासरी 81 हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मिळणाऱ्या उत्पन्नात दररोज 26 लाख 68 हजारांची भर पडत आहे. मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. सिंह, व्ही. चंद्रशेखर व वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.

Inline images 1

Post Bottom Ad