'मेक इन इंडिया' अभियान २५ सप्टेंबरपासून? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2014

'मेक इन इंडिया' अभियान २५ सप्टेंबरपासून?

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी जागतिक आणि भारतीय उद्योगपतींच्या उपस्थितीत महत्त्वाकांक्षी 'मेक इन इंडिया' मोहिम २५ सप्टेंबरला सुरू करणार आहेत. देशाला जागतिक उत्पादन हब बनवणे हा या मोहिमेचा हेतू आहे. विज्ञान भवनात होणार्‍या या कार्यक्रमात शेकडो जागतिक आणि भारतीय मुख्य कार्यपालक अधिकारी (सीईओ) सहभागी होण्याची शक्यता असल्याची माहिती एका अधिकार्‍यानी दिली. 


स्वातंत्र्य दिनानिमित्त पहिल्यादांच देशाला संबोधित करत असताना पंतप्रधान मोदी यांनी 'कम, मेक इन इंडिया'चा नारा देत, जगभरातील उद्योगपतींना भारतात कारखाना सुरू करण्याचे निमंत्रण दिले होते. पंतप्रधानांचे हे आव्हान यशस्वी करण्यासाठी सदरचे अभियान एकाच वेळी मुंबई, चेन्नई आणि बंगळुरूसह विविध राज्यांच्या राजधानीत सुरू करण्यात येईल. हे अभियान अशा देशांमध्येही सुरू करण्यात येईल, ज्यांची राष्ट्रीय स्टँडर्ड वेळ भारताशी मिळतीजुळती आहे. या अभियानामुळे देशात मोठय़ा प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्या बरोबरच व्यापार आणि आर्थिक वृद्धीला गती मिळणार आहे.

Post Bottom Ad