मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेच्या कामगार विभागातर्फे कर्मचारी व कामगारांमध्ये आपल्या कामाप्रती सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विविध स्वरुपाचेप्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात असून या प्रशिक्षण वर्गाचा कर्मचाऱयांमध्येसकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्यामध्ये मोठा हातभार असल्याचे प्रतिपादन मध्यवर्ती भरती प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त भारत मराठे यांनी केले.
कामगार शिक्षण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे महापालिकेतील कामगार शिक्षकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन `एफ/दक्षिण’ विभाग कार्यालयात आज (दिनांक १६ सप्टेंबर, २०१४) करण्यात आले होते, त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उप आयुक्त (परिमंडळ – २) आनंद वागराळकर, `एफ/दक्षिण’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय कुऱहाडे, प्रमुख कामगार अधिकारी शुभदा कामथे हे मान्यवर उपस्थित होते.
उप आयुक्त मराठे बोलताना पुढे म्हणाले की, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामगार व कामगार शिक्षकांनी आपले काम करताना महापालिकेच्या सामुहिक हिताला प्राधान्य द्यावे. यासोबतच निवासी प्रशिक्षण वर्गासाठी आपल्या विभागामार्फत पर्यायी जागा सुचवावी. जेणेकरुन आपल्या विभागाला मदत करणे शक्य होऊ शकेल, असेही ते म्हणाले. आगामी विकास नियोजन आराखड्यात प्रशिक्षण वर्गासाठी जागेची तरतूद करण्याबाबत आपल्या विभागामार्फत विकास नियोजन विभागाला पत्र द्यावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. विविध आस्थापनांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱयांनी कामगारांच्या समस्या सोडविल्या तर तेअधिक जोमाने काम करतील, असेही ते शेवटी म्हणाले.
उप आयुक्त (परिमंडळ – २) आनंद वागराळकर यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, कामगारांची मुंबईतील विविध आंदोलनेजवळून बघितली असून कामगारांनी सुशिक्षित व सुजाण होणेही काळाची गरज आहे. कामगारांचेहित डोळ्यासमोर ठेऊन बृहन्मुंबई महापालिकेतर्फेहा दिवस साजरा करण्यात येतो. यापुढील काळातसुद्धा उप आयुक्त मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक चांगल्या योजना व प्रशिक्षण आपण राबवू, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.