मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आचार संहितेचा भंग केल्याची तक्रार देश बचाव पार्टीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी केली आहे . या तक्रारीची दाखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने चौकशी सुरु केल्याची माहिती पाटील यानी आज पत्रकार परिषदेत दिली.
१२ सप्टेबरला ४:३० वाजता निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या घोषणा करण्यात आली या घोषणेनंतर लगेच आचार संहिता लागू झाल्यानंतर मुख्यमंत्रांनी ३५ आदेश पारित केले . तसेच उपसचिव, सह संचालक, जल संपदा विभागातील कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, पशु संवर्धन विभागातील कार्यकारी अभियंता पशु संवर्धन विभागातील उपसंचालक, गृह विभागातील आय पीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
या प्रकरणी देश बचाव पार्टीने महाराष्ट्रातील निवडणूक विभाग व केंद्रीय निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक विभागाचे आर. के. श्रीवास्तव यांनी सदर प्रकरण राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवून चौकशी करून अहवाल सदर करण्यास सांगितला असल्याची माहिती पाटील यांनी यावेळी दिली आहे.