मुंबई / अजेयकुमार जाधव / JPN NEWS http://jpnnews.webs.com
लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचा भ्रष्टाचार, मंडळाच्या कामात होणारी मनमानी, निकृष्ट दर्जाचे व्यवस्थापन, पालिकेचा दंड थकवणे इत्यादी प्रकार गेले तीन दिवस वृत्तपत्रातून प्रसिध्द होताच याची गंभीर दखल मुंबईकर नागरिकांनी घेत लालबागचा राजाच्या दर्शनाकडे पाठ फिरवली आहे. यामुळे मंगळवारी दुपारी मुखदर्शनाच्या रांगेतील भाविकांची संख्या अत्यल्प दिसून आली़.
त्यामुळे आता मुंबईतील भक्तांनी तर ‘राजा’चे दर्शन दुरूनच घेण्याचे ठरविले आहे. यंदा मुंबईपेक्षा अन्य ठिकाणच्या लोकांची रीघ अधिक असल्याचेही दिसून येत आहे. मात्र मंगळवारी दुपारी लालबाग परिसरात मुखदर्शनाच्या रांगेत भाविकच दिसून आले नाहीत. त्यामुळे आता तरी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी धडा घेत भाविकांशी असभ्य वर्तणूक करू नये. भ्रष्टाचार थांबवावा, पालिका पोलिस, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने, राज्य सरकारने मंडळाची आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांची चौकशी करून दोषी पदाधिकार्यांवर कारवाही करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मंडळाकडून भक्तांकडून जमा केलेल्या पैशांवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते गब्बर झाले असल्याने यंदाच्या गणोशोत्सवात ‘राजा’च्या दर्शनाची गर्दी ओसरताना दिसू लागली आहे.
मंगळवारी मुखदर्शनाची रांग सोडण्यावरून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी बंदोबस्तावरील पोलिसांशी हुज्जत घातली. दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला. हा प्रकार इतका वाढला की मंडळाच्या पदाधिका:यांना मध्यस्थी करावी लागली. त्यानंतर मुखदर्शनाच्या रांगेभोवती निर्माण झालेला तणाव निवळला. याप्रकरणी हुज्जत घालणा:या कार्यकर्त्याविरोधात काळाचौकी पोलिसांनी एनसी नोंदविल्याची माहिती अप्पर आयुक्त आर. डी. शिंदे यांनी पत्रकारांना दिली. हा प्रकार घडल्यावर सर्वत्र शाब्दिक बाचाबाचीनंतर पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावण्यात आल्याची चर्चा सुरु होती. मात्र अप्पर आयुक्त शिंदे यांनी ती अफवा असल्याचे सांगितले.
गेल्यावर्षीही महिला भाविकांना मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून असभ्य अशी वागणूक मिळाली होती. सागर गुप्ता या कार्यकर्त्याने २८ सप्टेंबर २०१२ मध्ये भाविक महिलेला मारहाण केली होती. महिला भाविकाला मारत असलेला प्रकार पाहून एका महिला पोलिस कार्माचारीने त्या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न केला असता उमेश जाधव या सभासदाने महिला पोलिसाच्या कानाखाली मारली होती. याचे सर्व चित्रीकरण सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झाले असताना पोलिसांनी कोणतीही कारवाही केली नाही. यामुळे मंडळाच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. कार्यकर्त्यांवर पोलिसांनी वेळीच कारवाही केली असती तर या वर्षी पुन्हा असा प्रकार घडलाच नसता अशी चर्चा होत आहे.