मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईलचोरीचे प्रमाण वाढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 September 2014

मुंबईच्या लोकलमध्ये मोबाईलचोरीचे प्रमाण वाढले

मुंबईची लाइफलाईन समजल्या जाणाऱया लोकलमध्ये वाढत्या चोरींच्या घटनामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पूर्वी गर्दीच्या वेळी पाकिट, घडय़ाळ चोरीचे प्रमाण अधिक असायचे मात्र आता मुंबईकरांच्या हातात स्मार्ट फोन  आल्यापासून चोरटय़ांचे आणखीच फावले आहे.  रेल्वे पोलिसांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार या वर्षी जानेवारी ते ऑगस्टपर्यंत 906 वेगवेगळे मोबाईल चोरीला गेले होते. त्यामधील 506 मोबाईल जप्त करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जवळजवळ महिन्याला 113 तर दिवसाला 3 ते 4 मोबाईल चोरी होत असल्याचे समोर आले आहे. 

लोकलच्या तिन्ही मार्गांवर होणाऱया या चोऱया काही विशिष्ट स्थानकांदरम्यान होत असल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेमार्गावर दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, ठाणे ते दिवा दरम्यान मोबाईल चोरीचे प्रमाण अधिक आहे. हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर अशा प्रकारच्या स्थानकांची रेकी केली असून या स्थानकांवर पोलिसांनी विशेष गस्त ठेवली आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास ठाणे रेल्वे पोलिसांनी गस्त घालून एका सराईत ंमोबाईल चोराला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून 3 मोबाईल हस्तगत केले असून त्यांची किंमत 61 हजारांच्या घरात आहे. मोबाईल चोरांना पकडण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. मोबाईल फोनचा आयएमईआय नंबर पोलिसांना उपलब्ध करून दिल्यास चोरापर्यंत लवकर पोहोचणे शक्य होते, असे रेल्वे पोलिसांनी सांगितले आहे.

Post Bottom Ad