ओवेसींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 September 2014

ओवेसींविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल

मुंबई : हैदराबादमधील 'ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन'चे (एआयएमआयएम) नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्याविरोधात मुंबई पोलिसांनी परवानगी न घेताच रॅली आयोजित केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. 

ओवेसी यांनी गेल्या आठवड्यात शुक्रवारी आग्रीपाडा येथील अरब मशिदीला भेट दिली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षाचे काही कार्यकर्ते मिरवणूक आणि जाहीर सभा आयोजित करण्यास आवश्यक परवानगी मागण्यासाठी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गेले होते. पोलिसांनी त्यांना तशी परवानगी देण्यास नकार दिला होता. परवानगी दिली नसतानाही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रॅली आयोजित केली व त्या सभेदरम्यान ओवेसी यांनी उपस्थितांसमोर भाषणही केले. त्या वेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीही केली होती. ओवेसी यांनी परवानगी न घेताच रॅली आयोजित केल्याबद्दल पोलिसांनी त्यांच्याविरोधात बॉम्बे पोलीस अँक्टच्या कलम ३७(१)(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad