राम कदमांच्या प्रवेशामुळे शिवसेना भाजपात असंतोष - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2014

राम कदमांच्या प्रवेशामुळे शिवसेना भाजपात असंतोष

Inline images 1
मुंबई : घाटकोपर पश्चिम येथील आमदार राम कदम यांच्या भारतीय जनता पार्टी मधील प्रवेशामुळे घाटकोपरसह ईशान्य मुंबईतील भाजपा कार्यकर्ते, पदाधिका:यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या, पक्षाला न जुमानता आत्मकेंद्री राजकारण करणा:या कदमांना स्वीकारण्याआधी आपल्याला अंधारात ठेवल्याचा आरोप पदाधिका:यांनी भाजपा नेत्यांवर केला आहे. हा निर्णय येत्या निवडणुकीत पक्षाला जड जाईल, अशी टोकाची भावना या पदाधिका:यांकडून व्यक्त होत आहे. कदम यांना उमेदवारी मिळाल्यास घाटकोपर पश्चिम आणि जिल्हास्तरावरील अनेक पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात अशी माहिती भाजपातील काही पदाधिकार्यांनी दिली आहे. 
राम कदम आणि मनसेमध्ये गेल्या काही महिन्यांपासून बिनसले होते. मनसेमध्ये आपल्याला विधानसभेचे तिकीट मिळणार नाही याची खात्री असलेल्या कदम यांनी आपल्या ब्यानर व पोस्टर वरून गेले काही महिने मनसेचे नाव निवडणूक चिन्ह आणि राज ठाकरे यांचे फोटो काढून टाकले होते. यामुळे कदम यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे याची खात्री झाली होती. पण कदम हे कुठल्या पक्षात जाणार हे नक्की नव्हते. गेल्या काही दिवसांपासून राजकीय आश्रय शोधणा:या कदम यांना भाजपाने स्वीकारले. पुण्यातील जाहीर कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत कदम यांनी भाजपात प्रवेश केला. येत्या निवडणुकीत ते घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून भाजपातर्फे लढण्याची दाट शक्यता आहे. 

या घडामोडीमुळे घाटकोपर पश्चिमसह संपूर्ण ईशान्य मुंबईतील भाजपाचे पदाधिकारी अस्वस्थ आणि संतापलेले आहेत. कालर्पयत ही अफवा आहे, कदम यांचा विषयच नाही, असे पक्षप्रमुखांकडून सांगण्यात येत होते. मात्र आज दुपारी वृत्तवाहिन्यांच्या माध्यमातून कदम यांच्या पक्षप्रवेशाची माहिती मिळाली आणि सर्वानाच धक्का बसला, असे एका स्थानिक पदाधिका:याने सांगितले. स्थानिक पदाधिका:यांना विश्वासात घेतल्याशिवाय भाजपात कोणालाही प्रवेश दिला जात नाही. मात्र कदम यांच्या बाबतीत हा नियम अपवाद ठरला, याचे आश्चर्य वाटत असल्याचे त्याने पुढे स्पष्ट केले. 

आमदार म्हणून कदम यांनी घाटकोपर पश्चिम मतदारसंघात एकही पायाभूत सुविधा किंवा जनहितार्थ उपक्रम राबविला नाही. कोणताही विकास प्रकल्प या मतदारसंघात आला नाही. देवदर्शन घडवून, राख्या बांधून घेऊन किंवा संत असल्याचे भासवून ते फक्त दिशाभूल करीत आहेत, हे वास्तव आम्ही जनतेर्पयत नेले. पण उद्या याच कदमांचा प्रचार केल्यास जनता आम्हाला माफ करेल का, ही जनता भाजपाला मतदान करेल का, असा सवालही एका पदाधिका:याने विचारला. 

शिवसेनाही विरोधात
स्थानिक शिवसैनिकांनीही कदम यांच्या भाजपाप्रवेशाचा निषेध केला आहे. कदम आणि शिवसैनिकांमध्ये अनेकदा खटकेही उडाले होते. दहीहंडीच्या वेळी कदम यांनी शिवसैनिकांना शिव्या हासडल्या होत्या. काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे विभागप्रमुख सुधीर मोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कदम यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. शिवसैनिकांची भावना उद्धव ठाकरे यांच्यार्पयत पोहचवण्यात येईल. त्यांच्या आदेशानुसार कृती करू, अशी प्रतिक्रिया मोरे यांनी व्यक्त केली.

Post Bottom Ad