मुंबई: मुंबई पोलिसांनी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा भंडाफोड करून तीन महिला एजंटला अटक केलीय. सेक्स रॅकेट चालवणारी महिला एजंट श्रीमंत ग्राहकांना आकर्षित करायची. महिला एजंट ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मॉडेल्स आणि छोट्या पडद्यावरील अभिनेत्रींचा वापर करायची. महिला एजंटनं ज्युनिअर आर्टिस्टला बॉलिवूडमध्ये सप्लाय करण्याची बातमीही पुढे आलीय.
पोलिसांनी ह्युमन ट्रॅफिकिंग विरोधी शाखेसोबत मिळून मीरा रोड इथं छापा टाकला. या दरम्यान पोलिसांनी तीन महिलांना अटक केली. या महिला एकाहून एक बॉलिवूडच्या ज्युनिअर आर्टिस्टसाठी एजंट म्हणून काम करत होत्या. पोलिसांनी एजंटजवळून कंडोम आणि 3000 हजार रुपयेही जप्त केले.
आरोपींमधील एकीची ओळख झालीय. भाईंदरमध्ये राहणारी यासमीन शेख आणि नायगांवला राहणारी प्रज्ञा सावे अशी त्यांची नावं आहेत. तर तिसरी महिला एजंट मीरा रोडवर राहणारी रूबीना शेख असं सांगण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी आठ ज्युनिअर महिला कलाकारांनाही त्यांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार ज्युनिअर आर्टिस्टचं वय 20-26 वर्ष आहे आणि या ग्राहकांकडून एका दिवसात 20 ते 50 हजार रुपये घ्यायच्या.
पोलिसांनी सांगितलं की, आरोपी आपल्या फोननं सेक्स रॅकेट चालवायच्या. त्यांच्यावर कोणाचा संशय होऊ नये म्हणून सार्वजनिक ठिकाणीच त्या ग्राहकांसोबत डील करायच्या. पोलीस रूबीनाकडून तिच्या बॉलिवूड रिलेशनबद्दल चौकशी करत आहेत.