आज विधानसभा निवडणुकीच्‍या घोषणेची शक्‍यता - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 September 2014

आज विधानसभा निवडणुकीच्‍या घोषणेची शक्‍यता

मुंबई - लवकरच राज्यात विधानसभा निवडणुकीचे नगारे वाजणार आहेत. मंगळवारपासूनच राज्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. निवडणूक आयोगाची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद होत आहे.

महाराष्ट्रा बरोबरच हरियाना, झारखंड आणि जम्मू-काश्‍मीर विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे जम्मू-काश्‍मिरातील निवडणुका लांबण्याची शक्‍यता असली तरी उर्वरित तीन राज्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्‍यता आहे. गणेशोत्सवामुळे महाराष्ट्रातील निवडणूक कार्यक्रम लांबल्याचे बोलले जाते. सोमवारी गणेश विसर्जन झाल्याने उद्यापासून निवडणुकीची रणभेरी वाजण्याची शक्‍यता आहे.

महाराष्ट्र, हरियाना, झारखंड आणि जम्मू-काश्‍मीर या चार राज्यांत निवडणुका होणार आहेत. विशेष  म्हणजे या चारही राज्यात भाजप सत्तेवर नाही. महाराष्ट्रात १५ वर्षांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेतृत्वातील आघाडी सरकार आहे. हरियानात कॉंग्रेस, झारखंडमध्ये झारखंड मुक्‍ती मोर्चा तर जम्मू-काश्‍मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स सत्तेवर आहे. त्यामुळे केंद्रात सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्षासाठी या चारही राज्यांतील निवडणुका महत्त्वपूर्ण आहेत.

महाराष्ट्रातील पक्षीय बलाबल
कॉंग्रेस - ८१  
राष्ट्रवादी कॉंग्रेस - ६२
भारतीय जनता पक्ष - ४७
शिवसेना - ४५
मनसे - १२
शेतकरी कामगार पक्ष - ०४ 
समाजवादी पक्ष - ०३
जनसुराज्य शक्‍ती - ०२ 
भारिप-बमसं - ०१
बहुजन विकास आघाडी - ०२
लोकसंग्राम - ०१
राष्ट्रीय समाज पक्ष - ०१
स्वाभिमानी पक्ष - ०१
माकप - ०१ 
अपक्ष - २४
रिक्‍त - ०१
एकूण - २८८

Post Bottom Ad