मुंबई माहिती आयुक्त जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2014

मुंबई माहिती आयुक्त जैन यांच्या विरोधात तक्रार दाखल

मुंबई माहिती आयुक्त अजित कुमार जैन  यांच्याकडून माहिती अधिकार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद पारगावकर यानी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या कडे लेखी तक्रार करून जैन यांची मुंबई माहिती आयुक्त पदा वरुन उचलबांगडी करण्याची मागणी केली आहे . 
केंद्रीय माहितीचा अधिकार २००५ अन्वये माहिती आयुक्तांना कर्तव्य बजावण्यास अनुमती असती ते कर्तव्या न बजावता जैन हे माहिती अधिकार कार्यकर्त्याना माहिती देण्यास योग्य सहकार्य नाही, अपीलासाठी  आलेल्या अपीलकार्त्याना सुनावणी वेळी पूर्णपणे बाजू मांडण्यास देत नाही, आपिलकर्ता सुनावनिदरम्यान गैरहजर असल्यास अपीलकर्त्यास माहितीची आवशक्यता नाही असे सांगून एकतर्फी निकाल देतात वा सुनावणी दरम्यान आलेल्या माहिती अधिकार कार्यकर्त्याना तासान तास त्यांच्या दालनात रखडवून ठेवत असल्याचे पारगावकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

मुंबई माहिती आयुक्त अजितकुमार जैन यांच्या कडून नेहमी माहिती असमाधानकारक मिळत असल्याचे ही त्यानी सांगितले अहे. त्यामुळे जैन यांची माहिती आयुक्त पदावरून उचलबांगडी करून नवीन माहिती अयुक्ताची वर्नि लावावी अशी मागणी पारगावकर यानी केंद्रीय माहिती आयुक्त व मुख्य माहिती आयुक्त महाराष्ट्र यांच्या कडे केली आहे.

Post Bottom Ad