रक्तचंदनाने भरलेला कंटेनर चोरला - शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 September 2014

रक्तचंदनाने भरलेला कंटेनर चोरला - शेकाप नगरसेविकेच्या पतीला अटक

चोरीच्या कंटेनरवर कस्टमने पूर्वी ठेवलेल्या रक्तचंदनाच्या कंटेनरचा नंबर पेंट करून रक्तचंदनाने भरलेला कंटेनर चोरल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या मुंबई महापालिकेतील एकमेव नगरसेविका खैरोनिसा अकबर हुसेन यांचा पती अकबर शफी हुसेन उर्फ राजूभाई उर्फ राजू बाटला याला उरण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत प्रताप धायगुडे आणि डीआरटी प्रकल्प असलेला रक्तचंदनाचा कंटेनर बाहेर काढण्यात मदत करणार्‍या आणखी तिघांनाही अटक करण्यात आली. 


परदेशात कोट्यवधींची किंमत असणार्‍या रक्तचंदनाचे दोन कंटेनर जेएनपीटी बंदरातून कस्टमने सुमारे वर्षभरापूर्वी पकडले ते पागोटेजवळील डीआरटी गोदामामध्ये २0१३पासून ठेवण्यात आले होते. या रक्तचंदन ठेवलेल्या कंटेनरचा नंबर दुसर्‍याच एका रिकाम्या चोरीच्या कंटेनरवर प्रिंट करून तो कंटेनर रक्तचंदन भरलेल्या कंटेनरच्या जागी ठेवून ज्यात रक्तचंदन होते तो खरा कंटेनरच या चोरांनी गायब केला. उरण पोलिसांकडील चोरीला गेलेल्या रिकाम्या कंटेनरच्या तक्रारीवर तपास करताना गुन्ह्याची उकल झाली. या प्रकरणात ज्यांनी चोरीच्या कंटेनरवर कस्टमच्या अखत्यारीतील कंटेनरचा नंबर छापून दिल्याबाबत साईनाथ पाटील आणि स्वप्नील पाटीलला प्रताप धायगुडेने ५0 लाख दिले. तर अकबर हुसेनवर यापूर्वी अनेक गुन्हे व तडीपारीची कारवाई केली होती. शेकापने त्याला विधानसभेची उमेदवारी दिली आहे.

Post Bottom Ad