लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचा आर्थिक भ्रष्टाचार आणि पालिकेची परवानगी न घेता मनमानी करत मैदाने आणि भिंती तोडणे असे प्रकार उघडकीस आले असताना मंडळाने बांधलेले हनुमान मंदिर सुद्धा बेकायदेशीर आणि अनधिकृत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाने करोडो रुपये खर्चून हनुमान मंदिर बांधले आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी मंडळाने करोडो रुपये खर्च केले आहेत. या मंदिरात करोडो रुपयाचे सोने चांदी चढवण्यात आले आहेत. लालबागचा राजाचे जेथे आगमन होते त्या ठिकाणी हे मंदिर बांधण्यात आले आहे.
काही वर्षापूर्वी हे मंदिर १० बाय १५ फुताहे होते. नंतर हे मंदिर ४० बाय ५५ फुटाचे करण्यात आले आहे. हे मंदिर पुन्हा बांधताना आणि पालिकेच्या हद्दीमध्ये बांधताना पालिकेची किंवा धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी घेण्यात आलेली नाही. याबाबत धर्मादाय आयुक्त कार्यालयाने माहिती अधिकारात असे कोणतेही मंदिर मंडळाने बांधले असल्याची नोंद कार्यालयाकडे नसल्याचे माहिती अधिकारात कळवण्यात आले आहे. मंडळाच्या पदाधिकारी आणि सभासदांनी आपल्या मर्जीनेच असे बांधकाम केले असले तरी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याविरोधात कोणतीही कारवाही केलेली नाही. भले मोठे मंदिर अनधिकृत असले तरी पालिका या मंदिराला संरक्षण देण्याहे काम करत आहे असे वेंगुर्लेकर यांनी सांगितले आहे.
लालबागचा राजा मंडळाकडून भक्तांकडून दरवर्षी दिले जाणारे दान दानपेटी मध्ये ठेवले जाते. अशी दान पेटी काही वर्ष पुरवी चोरी झाली आहे. हि पेटी चोरी झाल्याबाबत २०११ मध्ये मंडळाच्या मिटिंग मध्ये चर्चा करण्यात आली. परंतू याबाबत पुढे काहीही कारवाही झालेली नाही. या पेटी मध्ये ८० लाख रुपये असल्याची माहिती मिळते. दरवर्षी अश्या दान पेट्यामधून जमलेल्या पैश्यामधून मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकते गब्बर होत आहेत असा आरोप करून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गुन्हे विभागाकडून चौकशी करावी अशी मागणी वेंगुर्लेकर यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, पोलिस आयुक्त, धर्मादाय आयुक्त तसेच पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.