आघाडीत जागावाटपाचा तिढा कायम असताना काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी येत्या 19 सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली. दिल्लीत आज काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या वेळी आघाडीतील जागावाटपाच्या पुढील चर्चेची रणनीती आखण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसच्या स्क्रिनींग कमिटीची बैठक काल रात्री दिल्लीत पार पडली या वेळी काँग्रेसकडून 174 जागांची मागणी करण्यात आल्याचे समजते. आज होणाऱया बैठकीत याबाबतची चर्चा पूर्ण होणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिली.
Post Top Ad
16 September 2014
Home
Unlabelled
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 19 सप्टेंबरला
काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी 19 सप्टेंबरला
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.