टॅक्सी परमिटसाठी १0५७ पदवीधर तरुणांचा ऑनलाईन अर्ज - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 September 2014

टॅक्सी परमिटसाठी १0५७ पदवीधर तरुणांचा ऑनलाईन अर्ज

मुंबई : सध्या बेरोजगार तरुणांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. रोजगाराची संधी म्हणून तब्बल १0५७ पदवीधर तरुणांनी टॅक्सी परमिटसाठी ऑनलाईन अर्ज भरला आहे. येत्या वर्षभरात जेथे काळी-पिवळी टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावरून गायब होताना दिसणार आहे, तेथेच नव्या टॅक्सी चालविर्‍यांमध्ये पदवीधर तरुणांची संख्या जास्त आहे. 

परिवहन विभागातर्फे ७८00 टॅक्सी परमिटचे लॉटरी पद्धतीने वाटप करण्यात येणार आहे. मुंबई मेट्रोपॉलिटन रिझन ट्रान्सपोर्ट अँथोरिटी (एमएमआर) अंतर्गत येणार्‍या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईसाठी टॅक्सीची ही परमिट देण्यात येणार आहेत. टॅक्सी परमिटसाठी ८ वी पास असण्याची अट असली तरी पदवीधर तरुणांनीदेखील मोठय़ा संख्येने परमिटसाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत. २0 सप्टेंबरपर्यत ऑनलाईन अर्ज भरावयाचे होते. परिवहन विभागाला प्राप्त झालेल्या २७ हजार ५५८ अर्जांमध्ये ८ वी पास असणार्‍या अर्जदारांची संख्या १४,0१0 तर १0 वी पास असणार्‍यांची संख्या १३ हजारांच्या घरात आहे. आजच्या महागाईच्या जमान्यात आणखी एक उत्पन्नाचे साधन म्हणून रित्रा-टॅक्सीच्या परमिटकडे पाहिले जात असल्याचे मत परिवहन खात्यातील वरिष्ठ अधिकारी व्यक्त करतात. 

बहुसंख्य पदवीधर तरुण हे परमिट स्वत:च्या नावावर घेतात आणि मोठी रक्कम आकारून भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी देतात, असेही या अधिकार्‍याने सांगितले. फेब्रुवारी महिन्यात परिवहन विभागातर्फे सुमारे ६९ हजार रिक्षांचे परमिट लॉटरी पद्धतीने देण्यात आले होते. त्या वेळी परिवहन विभागाकडे १ लाख ७५ हजार अर्ज आले होते. त्यापैकी सुमारे ५ हजार अर्ज हे पदवीधर आणि उच्च विद्याविभूषित असणार्‍या तरुणांनी केले होते. सध्या टॅक्सीच्या परमिटसाठी जे २७ हजार ५५८ अर्ज आले आहेत. त्यापैकी मुंबईतील ३ आरटीओसाठी २२ हजार ५५८ अर्ज आले आहेत.

Post Bottom Ad