मुंबई : मुंबईकरांची सेकंड लाईफलाइन म्हणून ओळखली जाणार्या बेस्ट प्रशासनाच्या तब्बल १00 बसेसचे सांगाडे खिळखिळे झाले आहेत. या खिळखिळय़ा झालेल्या बसेस रस्त्यावर धावत असल्यामुळे त्यातून प्रवास करणार्या प्रवाशांची हाडे देखील खिळखिळी होत आहेत. या गाड्यांची दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव मंगळवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेपुढे ठेवण्यात आला होता. मात्र, या प्रस्तावात काही त्रुटी असून बेस्ट प्रशासन संपूर्ण माहिती बेस्ट समिती सदस्यांपुढे मांडत नसल्याची भूमिका घेत समिती सदस्यांनी या प्रस्तावाविषयी अधिक माहिती द्यावी आणि सुधारित प्रस्ताव सादर करण्यास प्रशासनाला सांगितले.
बेस्ट प्रशासनाच्या ताफ्यात २00४-0५ साली मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) अंतर्गत ६00 बसगाड्या दाखल झाल्या होत्या. आता १0 वर्षांनी या ६00 पौकी १00 बसगाड्यांचे सांगाडे खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे या सांगाड्यांची दुरुस्ती करण्याची आवश्यकता असल्याने बेस्टच्या वाहतूक विभागाने तसा प्रस्ताव तयार करून तो बेस्ट समिती समोर मंजुरीसाठी सादर केला आहे. या प्रस्तावामध्ये दिलेल्या माहितीनुसार या १00 बसेस सध्या रस्त्यांवर धावत आहेत. या प्रस्तावात अनेक त्रुटी असल्यामुळे त्याची तपशीलवार माहिती प्रशासनाने बेस्ट समिती सदस्यांना द्यावी, अशी मागणी बेस्ट समिती सदस्य केदार हुंबाळकर यांनी केली आहे.

या बसेसच्या सांगाड्यांच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाने निविदा मागवल्या आहेत. सुरुवातील ५ जाणांनी निविदा भरल्या असताना त्यातील तिघांना अपात्र ठरवून दोघांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. त्यानंतर या निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात आल्या आहेत. त्या निविदांमधून दोघांची निवड झाल्याचे प्रशासनाने आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. या निविदांनुसार एका बसगडीच्या दुरुस्तीसाठी अंदाजे २.४७ लाख रुपये खर्च येणे अपेक्षित आहे. म्हणजेच १00 बसगाड्यांसाठी २.४७ कोटी रुपये खर्च येणार आहे.