लाचखोरांना चाप लावण्यासाठी राज्यातील नाशिक, पुणे, औरंगाबाद, ठाणे, नांदेड, नागपूर, अमरावती आणि मुंबई अशा एकूण ८ परिक्षेत्रांना अधिकाधिक कारवाया करण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठरवून दिले. त्यासाठी विविध योजनाही अंमलात आणल्यामुळे कारवाईचा आकडा झपाट्याने पुढे सरकला. आतापर्यंत सर्व परिक्षेत्रांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ झालेली दिसून येत आहे. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आतापर्यंत एकूण १४ खात्यांमधील ३३ प्रकरणांद्वारे ६0 आरोपींवर गुन्हे दाखल केले. यात ६६ कोटी ४५ लाख इतकी प्रचंड बेहिशेबी मालमत्ता उघड झाली. तसेच गेल्या ९ महिन्यांमध्ये ८१0 सापळे रचून १ कोटी ८0 लाख ४६ हजारांची लाचेची रक्कमही विभागाने जप्त केली.
Post Top Ad
04 September 2014
Home
Unlabelled
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
लाचखोरीच्या प्रकरणांमध्ये १00 ते ५00 टक्क्यांनी वाढ
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.