वॉशिंग्टन : भ्रष्टाचारामुळे गरीब आणि विकसनशील राष्ट्रांमध्ये १ खर्व अमेरिकी डॉलर्स (६0 लाख कोटी रुपये) एवढी लूट केली जात आहे. एवढेच नव्हे, तर जगभरात सरासरी ३६ लाख लोकांच्या मृत्यूलासुद्धा भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा धक्कादायक अहवाल अमेरिकेतील एका प्रतिष्ठित संघटनेने बुधवारी जाहीर केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दारिद्रय़ निर्मूलनासाठी गेल्या दोन दशकांपासून केल्या जाणार्या कामांचा विकास भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीमुळे खुंटला आहे. त्याचबरोबर जगात दरवर्षी सरासरी ३६ लाख मृत्यूंना एकटा भ्रष्टाचार जबाबदार आहे, असे दारिद्रय़ निर्मूलनासाठी काम करणार्या 'वन' या अमेरिकी संघटनेने आपल्या अहवालातून स्पष्ट केले. भ्रष्टाचाराला दरवर्षी होणार्या १ खर्व अमेरिकी डॉलर्सचा घोटाळा, असे नाव देण्यात आले आहे. कमी सरासरी वार्षिक उत्पन्न असलेल्या राष्ट्रांमधून गोपनीयतेच्या नावातून होणारा भ्रष्टाचार उखडून फेकल्यास लाखो लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. तसेच यातून वाचणारा पैसा शिक्षण, रोजगार, विकास आणि लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी खर्च करता येईल. संघटनेने आपले म्हणणे पटवून देण्यासाठी आफ्रिकी खंडाचे उदाहरण दिले. एकट्या आफ्रिकी खंडात भ्रष्टाचार थांबल्यास त्यातून वाचणार्या पैशातून दरवर्षी १ कोटी मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलला जाऊ शकतो. दरवर्षी अतिरिक्त ५ लाख प्राथमिक शालेय शिक्षकांना पगार दिला जाऊ शकतो.