मुंबईच्या अग्निशमन दलाकडे जीवरक्षकांची वानवा असून समुद्रावर टेहळणी करण्यासाठी अग्निशमन दलाकडे साधी दुर्बिणही नसल्यामुळे मुंबईतील चौपाट्यांची सुरक्षा वार्यावर असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे जीवरक्षकांची संख्या कमी आहे, याकडे समितीचे लक्ष वेधले. सहा चौपाट्यांच्या रक्षणासाठी पालिकेकडे केवळ ५६ जीवरक्षक आहेत. त्यातही २२ जीवरक्षक कंत्राटी व अन्य हंगामी आहेत. एवढे अपुरे जीवरक्षक मुंबईच्या साडेसहा किलोमीटरच्या किनार्यांवर लक्ष कसे ठेवणार? असा सवाल त्यांनी केला, तर काही जीवरक्षकांना किनार्यावरील टेहळणीसाठी दुर्बिणही दिलेली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त करताना जीवरक्षकांच्या जागा निश्चित करा, अशी मागणी भाजपाचे गटनेते दिलीप पटेल यांनी या वेळी केली. मुंबईच्या समुद्रकिनार्यांवर शनिवारी आणि रविवारी फक्त दोन दिवस जीवरक्षक तैनात केलेले असतात. मग अन्य दिवशी दुर्घटना झाल्यास त्या रोखणार कशा? असा सवाल अन्य सदस्यांनी केला.