सफाई कामगारांना मालकीची घरे देण्याची सफाई कामगार विकास संघाची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

सफाई कामगारांना मालकीची घरे देण्याची सफाई कामगार विकास संघाची मागणी

मुंबई (प्रतिनिधी ) : धुळे पालिकेने त्यांच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे दिली आहेत. त्याच धर्तीवर मुंबई महापालिकेच्या सेवा निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या सफाई कामगारांना मालकी हक्‍काची घर द्या अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे सफाई कामगार विकास संघाचे सुनील चौहाण यांनी केली आहे. 

धुळे पालिकेच्या सेवेत असलेल्या 114 सफाई कामगारांना गेल्या महिन्यात मालकी हक्काच्या घराचे वितरण करण्यात आले. शासनाने 26 एप्रिल 1985 मध्ये लाड पागे समितीच्या धोरणानुसार वंश परंपरेने सफाईचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलेली सेवा निवासस्थाने मालकी हक्काने देण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रकही नगरविकास विभागाने काढले आहे. त्याच्या आधारे सफाई कामगारांना मालकी तत्वावर घरे द्या अशी मागणी सफाई कामगार विकास संघाचे चौहाण यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबईतील 57 वसाहतींमध्ये पालिकेचे सफाई कामगार सहा हजार निवासस्थानांमध्ये रहात आहेत. या वसाहती धोकादायक झाल्याने त्या खाली करण्याच्या नोटीसा पालिकेने दिल्या आहेत. कामगारांना चेंबूर वाशीनाका येथे कसल्याही सुविधा नसलेल्या ठिकाणी पाठविले जात आहे. त्याबाबत राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाच्या सदस्या डॉ. लता महंतो यांच्याकडे कर्मचाऱ्यांनी कैफियत मांडली होती. कामगार रहात असलेल्या ठिकाणीच त्यांना निवासस्थाने द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली होती. महंतो यांच्या आदेशा नुसार पालिका प्रशासनाने ही मागणी मान्य करून कामगारांना हमीपत्र देण्याचे मान्य केल्याचे पालिकेच्या सुत्रांनी सांगितले.

Post Bottom Ad