मुंबई : मॉडेलवर बलात्कार व विनयभंग केल्याच्या आरोपामुळे वादाच्या भोवर्यात सापडलेले वरिष्ठ आयपीएस अधिकारी सुनील पारसकर यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने केली आहे. आयोगाने यासंदर्भात मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना पत्र लिहिले आहे. मॉडेलवरील बलात्कार प्रकरणाच्या खुल्या आणि नि:पक्ष चौकशीसाठी एकतर पारसकर यांनी स्वेच्छेने पदभार सोडला पाहिजे किंवा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावे, असे आयोगाच्या अध्यक्षा सुशीबेन शाह यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे. पारसकर हे सध्या महाराष्ट्र पोलीस मुख्यालयात कार्यरत आहेत. जेव्हा पारसकर यांच्यासारख्या वरिष्ठ पोलीस अधिकार्यांवर बलात्कारासारखे गंभीर आरोप होतात, तेव्हा त्या आरोपांची कोणत्याही दबावाशिवाय चौकशी झाली पाहिजे, असे मत शाह यांनी व्यक्त केले आहे. पोलिसांनी 'लाय-डिटेक्टर टेस्ट'संदर्भातील पारसकर यांच्या वकिलांनी केलेल्या दाव्याची सत्यता पडताळली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
Post Top Ad
05 August 2014
Home
Unlabelled
पारसकरांना निलंबित करा - राज्य महिला आयोगाची मागणी
पारसकरांना निलंबित करा - राज्य महिला आयोगाची मागणी
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.