मेट्रो प्रवाशांसाठी महिनाभराचा पास मिळणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2014

मेट्रो प्रवाशांसाठी महिनाभराचा पास मिळणार

वर्साेवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गिकेतील प्रवाशांचा दैनंदिन प्रवास सुलभ सहज व्हावा यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने १ ऑगस्टपासून फेरीनुसार पास उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली आहे. मेट्रो प्रवाशांसाठी एकाच मार्गावरील ४५ व ६0 फेरीचे पास उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

नेहमी मेट्रो प्रवास करून कार्यालय गाठणार्‍या प्रवाशांना या पासचा उपयोग होणार आहे. या वनवे ४५ फेरीच्या पासची किंमत ६00 रुपये असून ६0 फेर्‍यांचा पास ८00 रुपये असणार आहे. या पासमुळे प्रवाशांच्या पैशाची बचत होणार असल्याचे एमएमओपीएलकडून सांगण्यात आले आहे. नव्या तिकीटदराची र्मयादा ३0 सप्टेंबरपर्यंत असून सर्वसामान्यांना मेट्रो प्रवासासाठी प्रोत्साहन देण्यासाठी विविध युक्त्या एमएमओपीएलकडून राबवण्यात येत आहेत. 

सध्या वर्साेवा ते घाटकोपर प्रवास करणार्‍यांना २0 रुपये तिकीट घ्यावे लागते, तर स्मार्टकार्ड युजरसाठी हे १५ रुपये तिकीट आहे. पण जर दैनंदिन पास वापरण्यास सुरुवात केल्यास हेच तिकीट १३.३३ रुपये दराने आकारण्यात येणार आहे. सध्या मेट्रोतून प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून स्मार्टकार्डचा वापर करण्यात येतो त्यामुळे प्रवासखर्चात बचत होते. या सवलतीच्या दरातील तिकिटांचा फायदा सर्वसामान्यांनी करावा, असे मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडून आवाहन करण्यात आले आहे. 

Post Bottom Ad