छेड काढणाऱ्यांना रोखण्यासाठी व्हिडीओ शूटिंग - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

छेड काढणाऱ्यांना रोखण्यासाठी व्हिडीओ शूटिंग

मुंबई - गणेशोत्सवाच्या काळात महिला व मुलींची छेड काढणाऱ्यांना रोखण्यासाठी व्हिडीओ शूटिंग करून, त्यांच्या पालकांना दाखवण्यात येणार आहे. हा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. संबंधित पथकातील पोलिसांकडे व्हिडीओ कॅमेरे दिल्याची माहिती पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी दिली. विनयभंग, तसेच बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्यांवरही प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. 

सार्वजनिक गणेशोत्सवांच्या ठिकाणी महिला व मुलींची छेड काढण्याच्या घटना वाढतात. त्या रोखण्यासाठी पोलिसांनी आवश्‍यक ती पावले उचलायला सुरुवात केली आहे. या काळात गर्दुल्ल्यांवरही जास्तीत जास्त कारवाया करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त मारिया यांनी सांगितले. मोटरसायकलस्वारांकडून सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. गणेशोत्सव मंडपांच्या आवारात पत्ते खेळण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. 

Post Bottom Ad