“कुंभार समाजाच्या मागण्या रास्त असुन त्या सरकारने पुर्ण करण्याची गरज आहे,या संघर्षात भारतीय जनता पक्ष कुंभार समाजाच्या पाठीशी उभा राहील” अशी ग्वाही मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी दिली.
महाराष्ट्र कुंभार महासंघाच्यावतीने आज आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करण्यात आले,या आंदोलनाला पाठींबा जाहिर करत मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आंदोलकांची आझाद मैदान येथे भेट घेउन त्यांना पाठिंबा दिला व महायुतीचे सरकार आल्यास संबंधीत प्रलंबीत मागण्यांची पुर्तता करण्यात येईल असे आश्र्वासन दिले.
कुंभार समाजासाठी स्वतंत्र बोर्ड स्थापन करणे कुंभार समाजातील गरजु मुलांच्या शैक्षणिक सुविधेसाठी मुंबई-पुणे इत्यादी ठिकाणी स्वातंत्र्य वसतिगृहे बांधणे कुंभार समाजाच्या व्यवसायाच्या सोयीसाठी प्रदुषण मंडळाच्या जाचक अटी शिथीलीकरण करणे माती वाहतूक परवाना मिळवूण देणे आदी मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र कुंभार महासंघाच्या वतीने आ. अॅड. आशीष शेलार यांना देण्यात आले.