मुंबई - नव्याने बांधण्यात आलेले मध्य वैतरणा धरण यंदा ओसंडून वाहण्याची शक्यता असल्याने मुंबईला 150 दशलक्ष लिटर पाण्याचा जादा पुरवठा होण्याची शक्यता आहे. सध्या मुंबईला 3750 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो.
मध्य वैतरणा धरणाचे काम गेल्या वर्षी अपूर्ण असल्याने त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवण्यात आले नव्हते. त्यामुळे सध्या त्यातून मुंबईला दररोज 300 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. प्रत्यक्षात 450 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होणे अपेक्षित आहे. यंदा या धरणाचे काम पूर्ण झाले आहे. पावसाचा दीड महिना बाकी असून, सध्या हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अडीच मीटरची उंची शिल्लक आहे. त्यामुळे या वर्षी प्रथमच हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. सध्या धरणातून 300 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. धरण पूर्णपणे भरल्यास पाणीपुरवठ्यात टप्प्या-टप्प्याने वाढ करण्याचा पालिकेचा विचार आहे.
मध्य वैतरणा पूर्ण क्षमतेने भरल्यास जादा 150 दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे. त्याने मुंबईतील पाण्याची गरज पूर्ण होणार नसली, तरी ज्या विभागात सध्या गरजेपेक्षा कमी पाणी मिळते, तेथे हे पाणी वळवता येऊ शकेल, असे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.