मुंबई : मुंबईत जसा पाऊस वाढत आहे त्या प्रमाणात आजारांची व रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. मुंबईमध्ये ताप, मालेरिया, लेप्टो, डेंग्यू आणि ग्यास्ट्रोच्या रुग्णांच्या संखेत जुलै महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे पालिकेने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे.
पालिकेच्या आरोग्य विभाग कडून मिळालेल्या माहिती नुसार जुलैच्या ४ आठवड्यामध्ये तापाच्या ५७४१, मलेरियाच्या ६७१, लेप्टोच्या ८, डेंग्यूच्या ३५, एच १ एन १ च्या १, ग्यास्ट्रोच्या १६१८, टायफाईडच्या ९२, हिपेटायटीसच्या १४५, तर कोलारच्या २ रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यातील पहिल्या तीन आठवड्यातील रुग्णांच्या संखे पेक्षा चौथ्या आठवड्यात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
जून २०१४ मध्ये तापाच्या ४६४२ मलेरियाच्या ५६६, लेप्टोच्या २, डेंग्यूच्या २७, एच १ एन १ च्या १ , ग्यास्ट्रोच्या ९१०, टायफाईडच्या ८०, हेपाटाटिसच्या ९६, चिकनगुनियाच्या ५ तर कोलारच्या १ रुग्णांची नोंद झाली होती. जून महिन्यात मुंबई मध्ये पाऊस पडला नसल्याने रुग्न्नांची संख्या कमी होती. मागील वर्षी जुलै महिन्यात पाऊस चांगल्या प्रमाणात पडला होता, त्यावेळी तापाच्या ६२६४, मलेरियाच्या १२६२, लेप्टोच्या २४, डेन्गु च्या ६६, एच १ एन १च्या २, ग्यास्ट्रोच्या २६०४, टायफाइडच्या १५२, हेपेटायसीस च्या १५२, चिकनगुनियाच्या ६, तर कोलोराच्या ४४ रुग्न्नांची नोंद झाली होती.