पेट्रोलपंप चालकांचा संप मागे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2014

पेट्रोलपंप चालकांचा संप मागे

मुंबई- एक राज्य, एक कर, एक दर या मागणीसाठी फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशनने पुकारलेला बेमुदत संप तूर्तास आज (सोमवार) मागे घेतला आहे, अशी माहिती असोसिएशन‘चे अध्यक्ष उदय लोढा यांनी दिली. 
राज्यातील पेट्रोलपंप चालकांनी आज मध्यरात्रीपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला होता. यामुळे राज्यातील पेट्रोल पंपांवर गर्दी झाली होती. परंतु, विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या मध्यस्थीनंतर संप तूर्तास मागे घेण्याचा निर्णय घेतला. महायुतीचे सरकार आल्यावर एलबीटी रद्द करू. शिवाय, पेट्रोल-डिझेल 5 ते 6 रुपयांनी स्वस्त करू, असे आश्वासन तावडे यांनी पेट्रोलपंप चालकांना दिले आहे.

दरम्यान, स्थानिक संस्था कर (एलबीटी), कच्च्या तेलावर स्टेट स्पेसिफिक ड्युटी यामुळे राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर जागेनुसार वेगवेगळे आकारले जातात. करस्वरुपात वसूल केला जाणारा पैसा अखेर ग्राहकांच्याच खिशातून वसूल केला जातो. सर्व कर रद्द करून एकसमान कर ठेवावा. एक कर लावल्यास लिटरमागे किमान 5 रुपयांनी पेट्रोल-डिझेल स्वस्त होईल, असा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.

Post Bottom Ad