भित्तिपत्रकांतून आता पाणी बचतीचे धडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2014

भित्तिपत्रकांतून आता पाणी बचतीचे धडे

मुंबई - हात धुण्यासाठी एक मिनीट नळ उघडा ठेवला, तर 12 लिटर पाणी वाया जाते. दात घासण्यासाठी पाच मिनिटे उघड्या ठेवलेल्या नळातून 60 लिटर पाणी वाया जाते, हे सांगणारी भित्तिपत्रके लावून पालिका पाणी बचतीचे धडे नागरिकांना देणार आहे. यावरील मजकूर सोप्या भाषेत, अर्धशिक्षित नागरिकालाही समजेल अशा पद्धतीचा असेल. लवकरच ही भित्तिपत्रके मुंबई शहरात लावण्यात येणार आहेत. 


पालिकेचा रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि जनसंपर्क विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. सवयी आणि शिस्तीतून दैनंदिन पाणी वापराच्या पाण्याची कशी बचत करता येईल, हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. वाहत्या नळातून एका मिनिटात 12 लिटर पाणी वाया जाते, असे सर्वसाधारण सूत्र आहे. नळ घट्ट बंद केला नाही, तर नळातून सेकंदाला एक थेंब गळत असेल, तर दररोज पाच लिटरहून अधिक पाणी वाया जाते. आठवड्याला 36.4 लिटर, वर्षाला 1 हजार 891 लिटर पाणी वाया जाते. भित्तिपत्रकांद्वारे याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. नळ घट्ट केल्यानंतरही पाणी गळत असेल, तर त्याविषयी हेल्पलाईन क्रमांकही महापालिकेकडून देण्यात आले असून, मुंबई शहर क्षेत्रासाठी 23678109, पश्‍चिम उपनगरांसाठी 26184173 आणि पूर्व उपनगरांसाठी 25153258 या दूरध्वनी क्रमांकांवर कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Bottom Ad