माळीन दुर्घटनेनंतर पालिकेला आली जाग - दरड कोसळणाऱ्या ठिकाणी ठेवणार नजर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2014

माळीन दुर्घटनेनंतर पालिकेला आली जाग - दरड कोसळणाऱ्या ठिकाणी ठेवणार नजर

मुंबई : पुण्यातील माळीण गावात घडलेल्या भीषण दुर्घटनेनंतर महापालिकेला जाग आली आहे. मुंबईतील डोंगराळ आणि पायथ्याशी वसलेली ३२१ ठिकाणे धोकादायक असून या ठिकाणी दरड कोसळून दुर्घटना घडू नये म्हणून महापालिका कडक उपाय योजना करणार आहे. या दरडींवर जिओलोगिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून कोणताही भूभाग सरकल्यास किव्हा खचल्यास त्याची माहिती तत्काळ संबंधित प्राधिकरणांना मिळणार आहे.   
म्हाडा , एमएम आरडी ए, सार्वजनिक बांधकाम विभाग, झोपडपट्टी प्राधिकरण, आपतकालीन व्यवस्थापन प्राधिकरण, महापालिका, जिल्हाधिकारी, या सर्व प्राधिकरनानची एक बैठक आज पालिकेत पार पडली. यामध्ये मुंबईतील डोंगराळ भागांचा आढावा घेण्यात आला . या बैठकीत  दरडींवर जिओलोजीकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून नजर ठेवण्यात येणार असून त्या संदर्भात उपाययोजना करण्यात आल्या . 

मुंबईतील १२०० ठिकाणी स्लम बोर्डाच्या माध्यमातून संरक्षक भिंती उभारण्यात आल्या आहेत. यातील काही ठिकाणच्या भिंती ढासळल्या आहेत. या भिंतींच्या दुरुस्तीचे काम म्हाडा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातून केले जाते मात्र हे काम वेगवेगळ्या प्राधिकरणांकडे न देता आता झोपडपट्टी प्राधिकरणाच्या माध्यमातून केले जाणार आहे.  म्हाडाने आयआयटीच्या भूगर्भशास्त्र विभागाकडून केलेल्या सर्वेक्षणात ३२१ पैकी ६१ ठिकाणे हि अतिसंवेदनशील ठरली आहेत.  या भागातील सुमारे १८ हजार झोपड्या धोकादायक स्थितीत आहेत. या झोपड्यांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्याबाबतची जबाबदारी राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाकडे असल्याचे पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी सांगितले.  

Post Bottom Ad