मुंबई - आगामी विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेणाऱ्या कॉंग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा घोळ अद्याप संपलेला नाही. त्यामुळे कॉंग्रेससोबत असलेल्या जोगेंद्र कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची (पीआरपी) मात्र फरपट होत आहे. या पक्षाने 24 जागांची मागणी केली आहे. मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी या पक्षांतील जागावाटप रखडल्याने पीआरपीच्या इच्छुक उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे.
लोकसभा निवडणुकीत पीआरपीने एकही जागा न लढवता कॉंग्रेस आघाडीला पाठिंबा दिला होता. विधानसभा निवडणुकांसाठी पक्षाने 24 जागांचा प्रस्ताव कॉंग्रेसपुढे ठेवला आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची वेळ आली, तरी अद्याप जागावाटपाची चर्चा सुरू न झाल्याने इच्छुक उमेदवार अस्वस्थ झाले असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत.
कॉंग्रेस व राष्ट्रवादीची जागावाटपाची बोलणी होईपर्यंत पीआरपीला कोणत्या जागा द्यायच्या, याविषयी निर्णय होऊ शकणार नाही. निवडणुका तोंडावर आल्याने लवकरात लवकर हा निर्णय व्हावा, अशी अपेक्षा कार्यकर्ते व पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.