मुंबई (प्रतिनिधी ) : मुंबईच्या सी एस टी स्थानकाजवळील जी पी ओ ( मुख्य पोस्ट ऑफीसला ) बुधवारी दुपारी २ वाजता शॉक सर्किट मुळे आग लागली. सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी झाली नाही.अग्निशमन दलाच्या कर्मचार्यांनीहि वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने होणारी हानी टाळता आली. सुरक्षा रक्षक व अग्नीशामक दलाकडून आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने स्ट्याम्प वितरण विभाग व त्याजवळील सर्व्हर रूमला आग लागण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. तिकीट विभागा सामोरील बचत बँक विभागातही काही वेळाने शॉक सर्किट झाल्याने दिवस भर बँकिंग व स्टम्प चे वितरण बंद ठेवण्यात आले होते.
Post Top Ad
07 August 2014
Home
Unlabelled
जी पी ओ मध्ये शॉक सर्किट मुळे आग
जी पी ओ मध्ये शॉक सर्किट मुळे आग
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.