मुंबई - लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक मोठे नेते शविसेनेत प्रवेश करू लागल्याने एकीकडे पक्षात आनंदाचे वातावरण असताना दुसरीकडे काही कट्टर शिवसैनिकांना मात्र चिंतेने ग्रासले आहे. आज सत्तेचे वारे महायुतीच्या दिशेने वाहू लागताच शिवसेनेकडे आलेले हे नेते निवडणुकीनंतर मात्र शिवसेनेत राहतील का? की दगाफटका करून पुन्हा आघाडीकडे जातील, अशी भीती शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्यांने व्यक्त केली.
गेल्या काही दिवसांत सोलापूर, नांदेड, नाशिक, कोकण अशा राज्यातील ववििध भागांतील काँग्रेस आिण राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी वा मंत्रिपदावर असलेल्या नेत्यांच्या नातेवाइकांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा धडाका लावला आहे. शविसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही शिवसेनेत येणा-याचे स्वागत करीत त्यांचा योग्य तो उपयोग करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले आहे. मात्र, त्यामुळे पक्षप्रमुखांचा निर्णय अंितम मानणाऱ्या कट्टर शविसैनिकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. सत्ता नसतानाही आम्ही केवळ शिवसेनेसाठी आिण बाळासाहेबांसाठी कष्ट उपसले. काँग्रेस आिण राष्ट्रवादीच्या विरोधात रान उठवले. जनतेमध्ये शिवसेनेबद्दल आपुलकी नरि्माण केली. लोकसभा निवडणुकीत कष्ट केले त्यामुळे चांगले यश मिळाले. आता पुन्हा विधानसभेवर भगवा फडकण्याची शक्यता नरि्माण झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीमधून शविसेनेत येणा-याची संख्या वाढली आहे. कारण ते नेते सत्तेशविाय राहू शकत नाहीत. काही ठिकाणी तर या नवोदितांनी विधानसभेचे तिकीट मिळणारच, असा प्रचारही केला आहे. असे असताना ज्यांच्याविरोधात शविसैनिकांनी काम केले त्यांचाच प्रचार करण्याची वेळ येऊ शकते किंवा त्यांच्यासोबत काम करावे लागेल, असेही एका कट्टर शविसैनिकाने सांगितले.
त्रिशंकू झाल्यास काय होणार?
शविसेनेतील एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, इतकी वर्षे या नेत्यांना शविसेनेत यावेसे वाटले नाही, परंतु आता महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसताच शविसेनेत प्रवेश करीत आहेत. उद्या त्यांना तिकीट मिळाले, शविसैनिकांच्या जविावर ते निवडून आले आिण निकालानंतर राज्यात ित्रशंकू अवस्था झाली तर ते शविसेनेतच राहतील, याची काय खात्री? असा प्रश्नही या नेत्याने उपस्थित केला.
काँग्रेसमध्ये इच्छुकांची संख्या रोडावली
राज्यात पुन्हा आघाडीची सत्ता येणार नाही, याची खात्री पटल्यामुळे काँग्रेसमध्ये तिकिटांसाठी इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याचेही शविसेनेतील सूत्रांनी सांगितले. काँग्रेसमध्ये कालपर्यंत फक्त २५०० जणांनीच इच्छा दर्शवली आहे. २००९ च्या नविडणुकीत एकूण १०,५२० जणांनी इच्छा दर्शवली होती, तर २००४ च्या नविडणुकीत ९८५० जणांनी आणि १९९९ मध्ये ७०८३ जणांनी नविडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली होती. त्यामुळे काँग्रेसचे काम खूपच हलके झालेले आहे. अशीच परिस्थिती राष्ट्रवादीमध्येही होऊ शकते, असेही म्हटले जात आहे.