पालिका प्रिंटिंग प्रेसमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

पालिका प्रिंटिंग प्रेसमधील घोटाळ्याच्या चौकशीची मागणी

भायखळा येथील महापालिकेच्या छपाईखान्यातील मशिन्स कार्यरत असतानाही पालिकेच्या आरोग्य विभागाने ४८ लाख रुपये खचरून खाजगी प्रिंटिंग प्रेसमधून साथीच्या आजाराबाबतचे पोस्टर छापून घेतली. पालिकेची अशा प्रकारे कामे होत असल्यामुळे यात घोटाळा होत आहे, असा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी स्थायी समितीमध्ये केला. पालिकेच्या दक्षता पथकातर्फे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. 

पालिकेच्या छपाईखान्यात सर्व आधुनिक छपाई यंत्रणा असतानाही पालिकेच्या आरोग्य विभागाने ४८ लाख रुपये खचरून साथीच्या आजारांबद्दल जनजागृती करण्यासाठी बाहेरील खाजगी छापखान्यात छापून घेण्यात आले. यात काही घोटाळा आहे, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी दक्षता पथकामार्फत करण्याची मागणी देशपांडे यांनी केली. सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनीही देशपांडे यांच्या मागणीला पाठिंबा दिला. 

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनीही अडीच लाख पोस्टरचा वापर प्रशासनाने कोठे व कसा केला, याची माहिती द्यावी, अशी मागणी केली. मनसेचे दिलीप लांडे यांनी पालिकेच्या छपाईखान्यातील कर्मचार्‍यांना काम नसेल तर त्यांना वेळ घालवण्यासाठी 'पत्ते' तरी द्या, असे उपरोधिकपणे सांगितले. चर्चेत शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांनीही भाग घेतला.

Post Bottom Ad