मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2014

मालगाडी घसरल्याने कोकण रेल्वे ठप्प

कोंकण रेल्वेवरील वीर आणि करंजाडी रेल्वेस्थानकां दरम्यान रविवारी सकाळी साडेसहा वाजता मालगाडीचे सात डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्ववत करण्यास वेळ लागणार असून गणशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या प्रवाशांपुढे या अपघातामुळे गावी कसे पोहोचायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

सकाळी मुंबईहून २०५ किलोमीटर वर असलेल्या करंजाडी या स्टेशन जवळ मालगाडीचे ७ डब्बे रुळावरून खाली घसरले आहेत. त्या पैकी ४ डब्बे जमिनीमध्ये रुतले आहेत. यामुळे रेल्वेची संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. गणेशोत्सवासाठी काही दिवस आगोदरच कोकणातील चाकरमानी मंडळी आपल्या गावी जाऊन उत्सव साजरा करतात. अशातच कोंकण रेल्वेवर अपघात झाल्यानंतर कोकणकडे निघालेल्या आणि कोकणातून येणाऱ्या सर्वच गाड्या विविध रेल्वे स्थानकां मध्ये अडकून पडल्या. त्यामुळे प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला. मालगाडीचे घसरलेले डबे हटवून मार्ग मोकळा करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मात्र वाहतूक पूर्ववत होण्यास नेमके किती तास लागतील याबाबत रेल्व प्रशासनाकडून निश्चित अशी कोणतीच वेळ देण्यात आलेली नाही. त्यामुळे सगळ्याच नियमित गाड्यांसह जादा गाड्यांचेही वेळापत्रक कोलमडले आहे.

कोकण रेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली पतंगे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना झालेला खोळंबा लवकरात लवकर दूर करण्यासाठी आमची सर्व यंत्रणा कामाला लागली असल्याची माहिती दिली. अॅक्सिडंट रिलिफ ट्रेन आणि अॅक्सिडंट रिलिफ मेडिकल व्हॅन घटनास्थळी दाखल झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कोकण रेल्वे मार्गावर सकाळपासून सर्वच स्थानकांमध्ये प्रवासी अडकून पडले आहेत. रेल्वे स्थानके प्रवाशांच्या गर्दीने भरली आहेत. पेन स्थानकात प्रवाशांनकडून गोधळ घातला असून स्टेशन मास्तरांना घेराव घातला आहे. 

मुंबईहून कोकणात जाणाऱ्या ७ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही गाड्या इतर मार्गाने वळवण्यात आल्या आहेत. ज्या प्रवाश्यांना प्रवास कार्याचा नाही त्यांना त्यांच्या तिकीटाचे पैसे परत करून पुढचा प्रवास तुमच्या सोयीन करा, असे सांगण्यात येत असल्याने काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला. लहान मुलं, वद्धांना तर मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. खेड रेल्वे स्थानकाजवळ एसटीने पर्यायी व्यवस्था म्हणून ४० विषेश बस तेथे सोडण्यात आल्या.

Post Bottom Ad