रिपब्लिकनची एमआयएमसोबत आघाडी होणार - डॉ. राजेंद्र गवई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

रिपब्लिकनची एमआयएमसोबत आघाडी होणार - डॉ. राजेंद्र गवई

मुंबई - रिपब्लिकन पक्ष (गवई गट) आगामी विधानसभा निवडणुकीत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तिहादुल मुस्लिमीन (एमआयएम) या पक्षासोबत आघाडी करण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस डॉ. राजेंद्र गवई यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. 


एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष सय्यद मोईन यांच्यासोबत त्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात आघाडी करण्याविषयी त्यांच्यात सविस्तर चर्चा झाली. रिपब्लिकन, बहुजन समाज, भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम अशी चार पक्षांची आघाडी करण्यासाठी गवई प्रयत्नशील आहेत. यासंदर्भात भारिप बहुजनचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, बसपचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड आणि डॉ. सुरेश माने यांच्यासोबत चर्चा झाली आहे. या चार पक्षांची आघाडी झाली नाही, तरी रिपब्लिकन पक्ष (गवई गट) आणि एमआयएमची आघाडी निश्‍चित होईल, असे डॉ. गवई म्हणाले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुबोध वाघमोडे, मुंबई अध्यक्ष आनंद खरात उपस्थित होते. पक्षातर्फे राज्यभरात शंभर जागा लढवण्यात येणार आहेत. मुंबईतील 90 टक्के जागा, विदर्भातील सर्व जागा व राज्याच्या इतर भागातील जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

Post Bottom Ad