मुंबई : दि स्कायलाईन एविएशन क्लब या एयर लाईन क्षेत्राशी संबंधित करियर विषयांचे प्रशिक्षण देण्यात येत असून पायलट प्रशिक्षणासाठी अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकार कडून २० लाख रुपयान पर्यंत शिष्यवृत्ती मिळण्याची सोय आहे अशी माहिती क्याप्टन माणेक यांनी दिली.
एविअशन क्षेत्रात अनुसूचित जाती जमातीच्या मुलांची चालू असलेली पिचेहाट या संदर्भात महाराष्ट्र शासनाने दाखल घेऊन सकारात्मक धोरण स्वीकारावे अशी मागणी माणेक यांनी केली. जागतिक वैमानिक विश्वात महाराष्ट्राने व मराठी लोकांनी ठसा उमटवला आहे. शिवकर बाबूजी तळपदे यांनी राईट बंधूंच्या आधी ८ वर्षे १८९५ साली पहिले विमान बनवले व ते महाराजा सयाजीराव गायकवाड व न्यायमूर्ती महदेव रानडे यांनी १५०० फुटां पर्यंत उडवून दाखवले. तर टाटांच्या आधी १९२७ मध्ये पुरुषोत्तम कांबळी यांनी लंडन ते कराची विमान पायलट म्हणून काम पहिले होते. या मराठी लोकांचा अभिमान बाळगून मराठी व अनुसूचित जाती जमातीच्या मुलांनी एयर लाईनचे प्रशिक्षण घावे असे आवाहन शाहीर वाघमारे यांनी केले.