टर्मिनल-टू जोडण्यासाठी धावणारी बेस्ट बंद होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

टर्मिनल-टू जोडण्यासाठी धावणारी बेस्ट बंद होणार


मुंबई : बेस्ट उपक्रमाने आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टर्मिनल टू जोडण्यासाठी सुरू केलेल्या बस सेवेला प्रवासी मिळेनासे झाल्यामुळे त्या बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ठाणे, बोरवली, वाशीवरून टी-टू जोडण्यासाठी सुरू केलेल्या तीन सेवा केवळ अडीच महिन्यांत बंद करण्याची वेळ बेस्टवर आली आहे. त्याचवेळी मेट्रो स्टेशनजवळील नव्याने सुरू केलेल्या सेवांनाही अल्प प्रतिसाद मिळत आहे, तर टीएमटी सेवेच्या विलीनीकरणास बेस्टने अनुकूलता दर्शवली आहे. 

बोरीवली, वाशी आणि बेलापूर येथून टर्मिनल टू जोडण्यासाठी बेस्टने तीन सेवा सुरू केल्या होत्या. मात्र केवळ अडीच महिन्यांत ही सेवा प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे बंद कराव्या लागत असल्याचे बुधवारी झालेल्या बेस्ट समितीच्या सभेमध्ये प्रशासनाने स्पष्ट केले. गुरुवारी सार्ज‍या करण्यात येणार्‍या बेस्ट दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बेस्टचे अध्यक्ष अरविंद दुधवडकर, महाव्यवस्थापक ओम प्रकाश गुप्ता यांनी वर्षभरातील बेस्टच्या कामगिरीचा आढावा घेतला.

बेस्टच्या सुमारे ३000 बसेसमध्ये सीसीटीव्ही, जीपीएस यंत्रणा, एससीएलआरवरून नवीन सेवा, सौरऊज्रेचा वापर आदीची माहिती या वेळी देण्यात आली. तसेच मेट्रो सेवेमुळे काही बससेवा तोट्यात गेल्यानंतर स्टेशन परिसरात काही मार्ग सुरू करण्यात आले; परंतु त्यांनाही कमी प्रतिसाद मिळत असल्याची माहिती गुप्ता यांनी या वेळी दिली. यातील एक ा फेरीमध्ये केवळ १५ प्रवासी येत असल्याने ही योजना अयशस्वी ठरली आहे. तसेच बेस्ट कर्मचार्‍यांना रात्री दीडनंतर बससेवा उपलब्ध असते. या सेवेचा फायदा प्रवाशांना होण्याचा प्रशासन विचार करणार आहे. त्याचप्रमाणे दादरवरून पूर्व अणि पश्‍चिम भागासाठी एखादी सेवा सुरू करण्याचा पर्यायही विचाराधीन ठेवण्यात आला आहे.
टीएमटीचे स्वागत
ठाण्यातील बससेवा बेस्ट सेवेत समाविष्ट झाल्यास त्यास प्रशासनाने अनुकूलता दर्शवली आहे. याबाबतच्या निर्णयाचा संपूर्णत: अधिकार सरकारचा आहे. विलीनीकरण झाल्यास दोन्ही भागातील प्रवाशांना तसेच प्रशासनालाही फायदा होऊ शकेल, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

Post Bottom Ad