धनगर समाजाचे सरकारला २४ तासाचे अल्टीमेट - रविवारपासून तीव्र आंदोलन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2014

धनगर समाजाचे सरकारला २४ तासाचे अल्टीमेट - रविवारपासून तीव्र आंदोलन

बारामतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आठ दिवसाची मुदत शनिवार संपत असुन शनिवारच्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडविला नाही तर रविवारपासुन संपुर्ण राज्यामध्ये तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे इशारा धनगर समाजाच्या नेत्यांनी शुक्रवारी काढण्यात आलेल्या महामोर्चामध्ये दिला. 


शुक्रवारी धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समितीकडुन भायखळा राणी बाग ते आजाद मैदान असे पारंपारीक वैशभुषेमध्ये महामोर्चा काढण्यात आले असुन आजाद मैदानमध्ये त्या मोचार्चे महासभेमध्ये रुपातंर जाले. यावेळी धनगर समाजाच्या विविध पक्षातील नेत्यांनी आपला पाठिंबा दर्शविण्यासाठी यावेळी महादेव जानकर, आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार रमेश शेंडगे, हरीदास बधे, अण्णा डांगे, आमदार अनिल गोटे यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. 

महाराष्ट्र सरकारकडुन गेल्या अनेकवषार्पासुन धनगर समाजाची फसवणुक करण्यात येत आहे. धनगर समाजाला घटनेनुसार एसटी वर्गामध्ये समावेश करण्यात आले पाहिजे पण सरकारकडुन १९६६ पासुन फसवुन करण्यात येत आहे. एसटी वर्गाच्या सोई सुविधा घेण्याचा धनगर समाजाचा हक्क असुन त्यांना जाणुनबुजुन त्यांना दुर ठेवण्यात आले आहे. शनिवारच्या बैठकीमध्ये धनगरांना एसटी प्रवर्गामध्ये  समावेश केले नाही तर रविवारपासुन राज्यभर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सुळ यांनी यावेळी स्पष्ट केले. 

शुक्रवारी आजद मैदानमध्ये काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख शरद पवार याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आले. राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख माधव जानकर यावेळी म्हणाले की, राष्ट्रवादीचे शरद पवार यांची नियत चांगली असेल तर सरकारमधुन बाहर पडुन धनगर समाजाला पाठिंबा द्यावे. तोडफोड जाळपोळ करु नका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फक्त बटन बदली करुन यांना धडा शिकवा असे आवाहान जानकर यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे येत्या चार महिण्यात खासदार होणार असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.

Post Bottom Ad