बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या रकमेत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय उपचाराच्या रकमेत वाढ

मुंबई - बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय परताव्याच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय बुधवारी (ता. 27) बेस्ट समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बदलती जीवनशैली आणि बदलत्या कामाच्या स्वरूपामुळे कर्मचाऱ्यांना काही गंभीर आजार झाले आहेत. त्यांच्यासाठी आता वाढीव आर्थिक मदत देण्यास प्रशासनाने अनुकूलता दर्शविली आहे. 

बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी हृदय शस्त्रक्रिया, किडनीरोपण, कर्करोग, बायपास या दुर्धर आजारांसाठी वैद्यकीय अर्थसहाय्य करण्यात येते. आता बदलत्या कामाच्या स्वरूपामुळे मेंदूची शस्त्रक्रिया, मणक्‍याच्या शस्त्रक्रिया, लांब हाडांच्या शस्त्रक्रिया, पेलव्हिक सर्जरी, यकृत रोपण या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी मोठा खर्च येतो. या आजारांचा वैद्यकीय विभागाच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी बेस्ट समितीचे सदस्य सुनील गणाचार्य यांनी केली होती. मधुमेहाचेही प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मधुमेहींसाठी आगारांमध्ये मधुमेह तपासणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. बेस्टचे महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांनी दरनिश्‍चिती आवश्‍यक असल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे आता आजारांसाठी वाढीव अर्थसहाय्य मिळेल.

Post Bottom Ad