मुंबई : मुंबईकरांना चांगल्या नागरी सुविधा पुरविण्याचा दावा करणार्या मुंबई महानगरपालिकेमार्फत कित्येक ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांच्या कालावधीत दूषित पाण्याच्या तब्बल ८६७ तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पावसाच्या आगमनानंतर या तक्रारींच्या संख्येत वाढ होऊन जून महिन्यात १,१२८ तक्रारी पालिकेकडे नोंदविण्यात आल्या असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीनुसार पुढे आले आहे.
शहरातील जलाशयांतून नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत होत्या. जून महिन्यात दूषित पाण्याच्या नोंदवण्यात आलेल्या तक्रारींपैकी शहराला १३ टक्के दूषित पाण्याच्या तक्रारी शहरांतून नोंदवण्यात आल्या आहेत. पश्चिम उपनगरांतून नऊ टक्के, तर पूर्व उपनगरांतील तक्रारींचे प्रमाण दोन टक्क्यांहून कमी असल्याचे पुढे आले आहे.
मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलाशयांतील पाणी शहारातील जलशुद्धी प्रकल्पात आणले जाते. पाण्याचे शुद्धीकरण झाल्यानंतर हे पाणी शहरातील २८ जलाशयांत साठवण्यात येते. त्यानंतर हे शुद्धीकरण केलेले पाणी वितरण व्यवस्थेद्वारे घरोघरी पोहोचवण्यात येते. विविध पाणीपुरवठा क्षेत्रात त्या त्या परिसरानुसार चोवीस तास ते ९0 मिनिटांपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पाण्याचे नमुने गोळा करण्याचे आणि ते तपासण्याचे काम महापालिकेमार्फतच केले जात असले तरी जलाशयातील दूषित पाण्याचे प्रमाण वाढल्याचे महापालिकेने नाकारले आहे. जलाशयातील पाणी दूषित होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. कारण या पाण्यावर जलशुद्धीकरण प्रकल्पांत प्रक्रिया केली जाते