मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महानगर पालिकेतील नगर सेवकांना पालिका मुख्यालयात आल्यावर त्यांच्या गाड्या पार्क करण्यासाठी पार्किंग उपलब्ध करून देणे हि पालिका प्रशासनाची जबाबदारी असून यामध्ये महिला नगर सेवकांच्या गाड्यांसाठी पालिकेच्या अंडर ग्राउंड पर्किंगमधील जागा उपलब्ध करून द्यावी , असे आदेश महापौर सुनील प्रभू यांनी प्रशासनास दिले.
पालिकेच्या शेजारी असलेल्या टाईम्स ऑफ इंडियाच्या नजीकच्या मार्गावर टाईम्ससाठी दिलेले पार्किंगचे कंत्राट पुन्हा स्थायी समितीत सदर प्रस्ताव री -ओपन करून रद्द करावे आणि त्या ठिकाणी नगर सेवकांना गाड्या पार्किंग करण्यास द्यावे आणि त्या ठिकाणी नगरसेवकांना गाड्या पार्किंग करण्यास द्यावे असेही महापौरांनी यावेळी सांगितले . यासंदर्भात प्रशासनाने तत्काळ निर्णय घ्यावा, असेही आदेश महपौरन्न्नि दिले . त्याच बरोबर बांद्रा - वरळी सी- लिंक वरून प्रवास करणाऱ्या नगर सेवकांना तोल माफी मिळावी या संबंधी साची अनिल डिग्गीकर यांच्याशी दूरध्वनीहून बोलणी झाली असुन त्यांनी नगर सेवकांच्या नेक गाडीला टोल माफिदेण्याचे मह्पौरांनी स्पष्ट केले.