मुंबई : राज्यामध्ये ८0 पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाजाचे प्राबल्य आहे. यातील सुमारे १५ मतदारसंघांचे नेतृत्व राज्यातील बडे नेते करत आहेत. हे नेते धनगर समाजाला आरक्षण लागू करण्याबाबत पाठिंबा व्यक्त करत आहेत. प्रत्यक्षात मात्र सरकारी पातळीवर काहीही करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याविरोधात विधानसभा निवडणुकीमध्ये रान पेटवणार असल्याचे 'धनगर समाज आरक्षण संघर्ष कृती समिती'चे अध्यक्ष हनुमंतराव सूळ यांनी सांगितले. हा निर्णय रविवारी बारामतीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
यामध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, गृहमंत्री आर. आर. पाटील, ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, वनमंत्री पतंगराव कदम आदी मंत्र्यांसह मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार जयकुमार गोरे यांच्याविरोधात नियोजनबद्ध प्रचार करण्यासाठी डावपेच आखले जात आहेत. यासाठी मागील आठवडाभरामध्ये दोन-तीन बैठका घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे, १ ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या मोर्चामध्ये धनगर समाज मोठय़ा प्रमाणावर उतरला.

तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात तीन दिवसांपूर्वी २५ हजार लोकांचा मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बारामतीतील आंदोलन रविवारी स्थगित केले असून येत्या ६ ऑगस्टपासून राज्यव्यापी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, असल्याचे आरक्षण कृती समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सध्या राज्यभरात धनगर समाजाच्या विविध संघटनांची आंदोलने सुरू आहेत. या सर्व संघटनांना एकत्र करून आंदोलनाचे स्वरूप ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन दिवसांमध्ये बैठक घेण्यात येणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.