महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एम-इंडिकेटर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एम-इंडिकेटर

उपनगरीय रेल्वे प्रवाशांमध्ये महिला प्रवाशांवरील वाढते हल्ले पाहता, पश्‍चिम रेल्वेने एम-इंडिकेटर या अँप्लिकेशनचे साहाय्य घेण्याचा विचार केला आहे. महिलांनी या अँपद्वारे गाडीची वेळ आणि डब्याचे स्थान कळवल्यास आरपीएफ हेल्पलाइनला संदेश प्राप्त होईल. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आरपीएफच्या वतीने पश्‍चिम रेल्वेच्या सभागृहात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी आरपीएफचे महानिरीक्षक देवेंद्र कासार यांनी याबाबतची माहिती दिली.

नेटवर्क नसतानाही एम-इंडिकेटर ऑफलाइन वापरता येऊ शकते. या सुविधेसंबंधी महिला प्रवाशांकडून सूचना मागािण्यात येत आहे. या परिसंवादात परेचे विभागीय व्यवस्थापक शैलेंद्रकुमार, रेल्वे बोर्डाचे सदस्य देविप्रसाद पांडे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद विजय झा उपस्थित होते. महिला प्रवासी आणि आरपीएफ जवानांमध्ये संवाद होणे गरजेचे असल्याचे मत या वेळी उपस्थितांनी व्यक्त केले. एम-इंडिकेटरमध्ये महिला प्रवाशांना अनुरूप बदल करण्यात येणार आहे.

Post Bottom Ad