ज्येष्ठ व निवृत्त मंडळींसाठी खास वेबसाइट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2014

ज्येष्ठ व निवृत्त मंडळींसाठी खास वेबसाइट

निवृत्तीनंतचे आर्थिक व्यवस्थापन, केंद्र सरकार, राज्य सरकारकडून ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या सवलती, आरोग्य सेवा, मुंबईत ज्येष्ठांसाठी असलेली उद्याने याची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यासाठी आज, शनिवारपासून www.60plus.co.in ही वेबसाइट खास ज्येष्ठांच्या सेवेत दाखल होत आहे. या वेबसाइटवर ज्येष्ठ व निवृत्त मंडळींसाठी माहितीचा खजिना उपलब्ध होणार आहे. 

मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये ज्येष्ठांच्या समस्यांमध्ये भर पडत आहे. अनेक वृद्ध मंडळी घरात एकाकी राहातात. त्यांच्यापर्यंत उपयोगी माहिती अनेकदा पोहोचत नाही. त्यामुळे सामाजिक जाणीवेतून ज्येष्ठांना मदतीचा हात देण्यासाठी दिनेश सोनावणे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नवीन वेबसाइट सुरू केली आहे. राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे माजी उपसंचालक महादेव सोनावणे यांचे अलिकडेच निधन झाले. सामाजिक सेवेत सतत कार्यरत असलेल्या आपल्या वडिलांच्या स्मृतीनिमित्त दिनेश सोनावणे यांनी ही वेबसाइट सुरू केली आहे.

www.60plus.co.in ची वैशिष्ट्ये

निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पैशाचे आर्थिक व्यवस्थापन, बँकांमधील व्याजदर, निवृत्तीधारकांसाठी विविध योजना, वीमा योजना, प्राप्तीकर सवलती यांची माहिती.ज्येष्ठांसाठी असलेल्या केंद्र व राज्य सरकारच्या विविध सवलती, हॉस्पिटल, मेडिकल स्टोअर्सची नावे, अँब्युलन्स सेवा, नर्स व आयांचा ब्युरो, आजारी व्यक्तींना मदत करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, ब्लड बँका, सरकारतर्फे ज्येष्ठांसाठी जाहीर केल्या जाणाऱ्या विविध योजना, मुंबईतील नाना-नानी पार्क, राज्यातील लाफ्टर क्लब यांची माहिती.समाजातील सेलिब्रेटी ज्येष्ठ व्यक्तींनी आयुष्याबाबत व्यक्त केलेले चिंतन व सकारात्मक विचार यांचे लेख.
२३ ऑगस्ट रोजी ही वेबसाइट ज्येष्ठांच्या सेवेत दाखल होत आहे.

Post Bottom Ad